That if thou shalt confess with thy mouth the Lord Jesus, and shalt believe in thine heart that God hath raised him from the dead, thou shalt be saved.
“यायकांनी, इस्राएल राष्ट्रा आणि राजाच्या घराण्यातील लोकांनो, माझे म्हणणे ऐका. कारण हा निवाडा तुमच्यासाठी आहे. “तुम्ही मिस्पातील सापळ्याप्रमाणे आहात.
तुम्ही पुष्कळ वाईट कृत्ये केली आहेत, म्हणून मी तुम्हा साऱ्याना शिक्षा करीन.
एफ्राईमला मी ओळखून आहे. इस्राएलची कृत्ये मला महीम आहेत. एफ्राईम, आता, यावेळी तू वश्येप्रमाणे वागत आहेस. इस्राएल पापाने बरबटली आहे.
इस्राएलच्या लोकांनी खूप वाईट गोष्टी केल्या आहेत, त्या वाईट गोष्टी त्यांना परमेश्वराकडे परत येण्यास अडथळा करतात. ते नेहमी दुसऱ्या दैवतांच्या मागे मागे जाण्याच्या मार्गाचाच विचार करतात. ते परमेश्वराला ओळखत नाहीत.
इस्राएलचा अहंकार त्यांच्याविरुध्द पुरावा आहे. म्हणून इस्राएल आणि एफ्राईम त्यांच्या पापांना अडखळतील. त्याच्याबरोबर यहूदाही अडखळेल.
“लोकांचे नेते परमेश्वराचा शोध घेतील. ते त्यांच्याबरोबर त्यांच्या ‘मेंढ्या’ व ‘गायी’ घेतील. पण त्यांना परमेश्वर सापडणार नाही. का? कारण त्यांने त्या लोकांचा त्याग केला आहे.
ते परमेश्वराशी प्रामाणिक राहात नाहीत. त्यांची मुले परक्यांपासून झालेली आहेत. आता परमेश्वर त्यांचा आणि त्यांच्या देशाचा पून्हा नाश करील”
“गिबात शिंग फुंका, रामात तुतारी फुंका. बेथ-आवेनमध्ये इषारा द्या. बन्यामीन, तुझ्यामागे शत्रू लागला आहे.
शिक्षेच्या वेळी एफ्राईम ओसाड होईल ह्या गोष्टी नक्की घडून येतील, असा खात्रीपूर्वक इषारा मी (परमेश्वर) इस्राएलच्या घराण्यांना देतो.
दुसऱ्यांची मालमत्ता चोरणाव्या चोरांसारखे यहूदाचे नेते आहेत. म्हणून मी (परमेश्वर)माझ्या रागाचा त्यांच्यावर पाण्याप्रमाणे वर्षाव करीन.
एफ्राईमला शिक्षा होईल. द्राक्षांप्रमाणे तो चिरडला व दाबला जाईल. का? कारण त्याने ओंगळाला अनुसरण्याचे ठरविले.
कसर ज्याप्रमाणे कापडाच्या तुकड्याचा नाश करते, तसाच मी एफ्राईमचा नाश करीन. लाकडाचा तुकडा सडून नष्ट होता, तसेच मा यहूदाला नष्ट करीन.
एफ्राईमने स्वत:चा आजार व यहूदाने स्वत:ची जखम पाहिली. म्हणून मदतीसाठी ते अश्शुरकडे गेले. त्यांनी सम्राटाला त्यांच्या समस्या सांगितल्या. पण तो सम्राट तुम्हाला बरे करु शकत नाही. तो तुमची जखम भरून काढू शकत नाही.
का? एफ्राईमच्या दृष्टीने मी सिंहाप्रमाणे होणार आहे. यहूदा राष्ट्राला मी तरुण सिंहासारखा होणार आहे. मी, हो मी, त्यांचे फाडून तुकडे तुकडे करीन. मी त्यांचे हरण करीन. आणि कोणीही त्यांना माझ्यापासून वाचवू शकणार नाही.
लोक त्यांचा अपराध कबूल करेपर्यंत आणि माझा शोध घेईपर्यंत मी माझ्या जागी परत जाईन. हो! त्यांच्या अडचणीच्या वेळी ते माझी कसून शोध करतील.”