That if thou shalt confess with thy mouth the Lord Jesus, and shalt believe in thine heart that God hath raised him from the dead, thou shalt be saved.
मी या आयुष्यात आणखी एक गोष्ट बघितली आहे. जी योग्य नाही. ती समजायला फार कठीण आहे:
देव माणसाला खूप संपत्ती, धनदौलत आणि मानमरातब देतो, त्या माणसाजवळ त्याला पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी आणि त्याला जे जे हवे ते सर्व असते. परंतु देव त्याला या सगळ्याचा उपभोग घेऊ देत नाही. कोणीतरी अनोळखी येतो आणि सारे काही घेऊन जातो. ही अतिशय वाईट आणि निरर्थक गोष्ट आहे. ळ्य
एखादा माणूस खूप वर्षे जगेल आणि कदाचित त्याला 100 मुले असतील. परंतु जर तो माणूस चांगल्या गोष्टीत समाधानी नसला आणि तो मेल्यावर त्याची कोणाला आठवणही आली नाही तर जन्मत:च मेलेल्या मूल त्या माणसापेक्षा खूप बरे आहे असे मला वाटते.
मूल मेलेले निपजणे ही अतिशय निरर्थक गोष्ट आहे. ते मूल लगेच निनावीच एका काळोख्या कबरेत पुरले जाते.
त्या मुलाला कधीही सूर्यदर्शन होत नाही. त्या मुलाला कधीही काहीही माहीत होत नाही. अशा मुलाला आयुष्यात देवाने दिलेल्या गोष्टींचा उपभोग घेऊ न शकणाऱ्या माणसापेक्षा अधिक विसावा मिळतो.
तो माणूस कदाचित 2000 वर्षे जगेल. पण त्याने जर आयुष्याचा उपभोग घेतला नाही तर जन्मत:च मेलेल्या मुलाने त्याच्यापेक्षा सगव्व्चात सोपा मार्गशोधला असे म्हणावे लागते.
माणूस खूप कष्ट करतो. का? स्वत:चे पोट भरण्यासाठी. पण तो कधीही समाधानी असत नाही. याच रीतीने शहाणा मूर्खा
पेक्षा अधिक चांगला नसतो. गरीब राहून आयुष्य जसे सामोरे येते तसा त्याचा स्वीकार करणे हे अधिक चांगले. आपल्याजवळ जे आहे.
त्यात समाधान मानणे हे अधिकाची हाव धरण्यापेक्षा बरे आहे. कारण अधिकाची हाव धरणे निरर्थक आहे. ते अधिक वाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
माणूस, म्हणजे ज्यासाठी त्याला निर्माण केले गेले तो एक माणूस आणि त्याबद्दल वाद करणे निरर्थक आहे. माणूस या विषयी देवाजवळ वाद घालू शकत नाही. का? कारण देव माणसापेक्षा शक्तिशाली आहे. आणि खूप वेळ वाद घातला तरी त्यात बदल होणार नाही.
माणसाच्या छोट्याश्या आयुष्यात त्याच्यासाठी पृथ्वीवर काय चांगले आहे ते कोणाला कळणार? त्याचे आयुष्य सावलीप्रमाणे सरकते. पुढे काय घडणार आहे ते त्याला कोणीही सांगू शकणार नाही.